Andharban Trek

सहज दि.११/१०/२०१८ ला फेसबुकला एस.जी. ट्रेकर्स ची वॉल पहिली आणि ग्रुपला join झालो. वास्तविक त्या दिवसी थोडे घसा viral होता, परंतु निश्चय केला जायचे ट्रेकला आणि अंधारबनची लिंक open केली त्यातील book & pay later ला क्लिक केले. परंतु काहीच replay नाही म्हणून लिंक मधील भ्रमणध्वनीला फोन लावला सेल busy; मनात म्हटले “नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.” याकरीता कि वयाच्या ४२ व्या वर्षी ट्रेकला जायचे ठरवले आणि दोन्ही ठिकाणी नाट लागला म्हणून तसे वाटले.परंतु पाच मिनिटात समोरून call आला,फोन केला होता का? क्रमांक save नसल्यामुळे प्रथम लक्षात नाही आले पण त्यानेच आठवण करून दिली ट्रेक बद्दल आणि हा…….मला यायचे होते म्हणून केला होता फोन. मी विचारले आपले नाव काय? समोरून उत्तर आले विशाल काकडे. हीच काय ती पहिली आपले टीम लीडर विशाल सरांची ओळख. प्रथम त्यांनी जागा शिल्लक नाही असे सांगतिले व तुम्ही रविवारच्या हरीश्चंद्रगड नळीची वाट या ट्रेकला येता का विचारले, पण मी नकार दिला. आम्ही दोघेजण आहोत सांगा असेल अंधारबनला जागा तर ? अर्धा तासाने विशालसरांनी confirmation काँल केला आणि परवा म्हणजे शनिवार १३/१०/२०१८ पहाटे sharp पाच वाजता लोकमंगल शिवाजीनगरला पोहचण्यास सांगितले. मनात विचार आला अरे तब्बेत थोडी बरे नाही जमेल का आपल्याला पण मनाने व हृदयाने ठरवले होते त्यामुळे शनिवारी घसा viral असताना सकाळी sharp पाचला लोकमंगलला पोहचलो.

अजय (अज्या या पुढे उल्लेख करणार म्हणून आधीच कंसात) हा माझ्याआधीच तिथे पोहचला होता बाकीचे ट्रेकमित्र आले होते.पहिलाच ट्रेक असलेमुळे लय उत्साह होता. लगेच विशाल सरांना फोन केला आणि दहा मिनिटात गाडी पण आली.देवाचे नाव घेतले आणि गाडीत बसलो.बाकीचे मेम्बर पण आले गाडी सुरु होणार ,अज्याला म्हंटले अरे मी एकटाच सगळ्यात मोठा दिसतो वयांनी आणि वजनानी(म्हणजे जाडपण), तितक्यात एक साठीच्या बाई आल्या म्हणाल्या एसजी.ट्रेकर्सची बस का सर्व जण आतून म्हणाले हो हो.बाई चिडलेल्या स्वरात “i m sitting n waiting for you” आणि लगेच गडबड करून बँग घेऊन आल्या ,बरे वाटले कोणीतरी आहे माझ्यापेक्षा वयांनी मोठे.सकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी बस सुरु झाली, वाटेमध्ये बाकीच्या ट्रेकर्स मित्रांना घेत चांदणी चौकात शेवटचा pick up घेऊन बस पुढे रवाना झाली,सकाळी ८ वाजता मुळशी मध्ये मस्त नाष्टा चहा पाणी उरकून ताम्हणी घाटाकडे रवाना झाली.

पुणे पोलादपूर रस्त्यावरुन उजवीकडे वळून पिंप्रीगावाकडे निघालो,पिंप्री गावाच्या अलीकडे बरोबर सकाळी साडेनऊच्या सुमारास एक टेहळणी स्पॉटला थांबलो. विशालसरांनी माहिती दिली सदर टेहळणी स्पॉटला “independance point”असे म्हणतात समोरील संपूर्ण सह्याद्रीचा पर्वत रांगामधून आपण चालत जाऊन हिरडी गावात दुपारच्या न्याहारी साठी थांबणार आहोत या ट्रेकला इंटरकॉन्टीन्टेल ट्रेक संभोतात,कारण ट्रेक हा डोंगरमाथ्यावरून सुरु होऊन सपाटीला संपणार आहे .सदर ठिकाणी लगेच आमच्यातला व अज्यातला फोटोग्राफर जागा झाला बरेच फोटो,सेल्फी घेऊन आम्ही पिंप्री गावाकडे निघालो.त्याठिकाणी गावातील एक माहितगार पिसाळ नावाच्या इसमाला बरोबर घेऊन आम्ही ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहचलो.

पिंप्री हे गाव मुळशी तालुक्यात असून ते पुणे जिल्ह्यातील अतिशय कमी लोकवस्तीचे गाव आहे. मुळशी तालुक्याची हद्द पूर्वेला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याशी, पश्चिमेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याशी भिडलेली आहे. दक्षिणेला वेल्हा तालुक्याशी, उत्तरेला मावळ तालुक्याशी भिडलेली आहे.भातशेती हाच येथील मुख्य उद्योग असल्याचे पिसाळ यांनी सांगितले तसेच बरेच जण आता पुणे,मुंबईला उदरनिर्वाहासाठी गेले आहेत.त्याच ठिकाणी आम्ही एकमेकाशी ओळख करून सकाळी पावणे दहा वाजता पहिल्या वाहिल्या ट्रेकला सुरुवात झाली.पिंप्री गावातील भात शेतामधून पुढे चालू लागलो .सध्या आपण पाहतो काही हौशी मंडळी ट्रेकला जातात रस्ता चुकणे ,आपण नेलेल्या प्लँस्टिक पिशवी, बॉटल कचरा करणे इ.गोष्टी करतात त्यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकार वन विभाग यांनी एक अधिकारी अशा ठिकाणी नेमला आहे. पिंप्रीत सुद्धा गवळी नावाचे वन अधिकारी नेमणुकीस होते, त्यांच्याकडील वन विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेत त्यांनी सांगीतलेल्या सुचनाचे पालन करीत पुन्हा चालण्यास सुरुवात केली.

अंधारबन याचा अर्थ असा आहे की जंगल इतके दाट आहे त्यातून जाताना अंधारचा भास होतो सदर अनुभव आता यायला सुरुवात झाली होती.काही वेळात आम्ही अशा स्पॉट पोहचलो कि ज्या ठिकाणापासून संपूर्ण ट्रेक मध्ये येणारे कुंडलिका खोरे(valley)डोंगर व शेवटी भिरा धरणाची भिंत हे दिसत होते(सोबत फोटो जो आपल्या एसजी.ट्रेकर्सचा DP आहे.) विशाल सरांनी संपूर्ण माहिती देताना पुन्हा एकदा आठवण करून दिली की हा जंगल ट्रेक आहे त्यामुळे तुम्ही जेवढा कमी आवाज करत चालला तर जंगलातील विवीध प्राण्याचे स्वर,आवाज तसेच विविध फुले,झाडे व त्यानुसार येणारे पक्षी जसे फुलावर येणारी फुलपाखरे पाहणाची व ऐकण्याची आपल्याला मेजवानी मिळेल.पुढे चालत असताना निसर्गाची विविध रूपं अनुभवत,एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे व दुसऱ्या बाजूने दाट जंगलातून आमची सफर सुरु होती अजून तरी ऊन लागले नाही किंवा दमल्यासारखे वाटले नाही.पुढे जसे जसे उंच डोंगर दरी येत होत्या तशा तशा आम्ही त्या डोळ्यात व कायमस्वरूपी स्मरणात राहतील म्हणून मोबाईलमधील कँमेरामध्ये कैद करत होता.जंगलातून जात असताना वाटेत बरेच झाडे पडलेली दिसली,कोकणचा रानमेवा करवंद ,कारवाचे जंगल विविधतेने नटलेल्या पिवळी फुलांचे पठार पाहत सह्याद्रीच्या विविध छटा पाहत पुढे चाललो होतो.सध्या पाउस पूर्ण ओसरल्यामुळे वाटे मध्ये बरेच धबधब्याचे उगमस्थान असलेले ओढे लागले परंतु ते सर्व कोरडे होते.अशाच एका ओढ्यात आमच्यातील मित्रांनी ‘’फिश स्पा’’ चा सुद्धा अनुभव घेतला जो जगातल्या कोणत्या स्पा मध्ये मिळणार नाही.पुढे कारवाचे जंगल विविध फुले तसेच लहान पिवळ्या रंगाच्या फुलांचे रान मला सिलसिला मधील “देखा एक ख्वाब तो यह सिलसिले हुये “या गाण्याची आठवण करून देत होते.थोडे पुढे गेल्यावर गवताचा पात्यावर एका सापाची कात पडलेली दिसली आपल्या सारख्यानी ती पाहणे म्हणजे नवलच. लगेचच त्याची पाहणी करून ती ‘’धामण’’ नावाच्या सापाची असलेल्याच तर्क आमचे कराडकर मित्र यांनी सांगितले तर विशालसरांनी त्याला दुजोरा देत १००% धामणच आहे असे सांगून शिक्कामोर्तब केले. मी आजपर्यंत बरेच सापांची कात पाहली आहे पण ही त्यापेक्षा वेगळी होती कारण शेपूट ते डोके,डोळ्याच्या लकब त्यात दिसत होत. त्याचा विचार करत discovery वाला Bear Grylls चे कर्माने चर्चा करत पुढे चालू लागलो.

बरेच अंतर गेल्यावर आता जरा पोट आवाज करू लागले व भुकेचे संकेत देऊ लागले होते त्यामुळे पावले जोरात जोरात चालू लागली होती बरोबरच्या मित्रांबरोबर विविध राजकीय, शैक्षणिक व ज्या क्षेत्रामधील कार्यरत त्या क्षेत्रातील गप्पा मारत कधी हिरडी गाव आले ते कळालेच नाही. हिरडी गावात एक छोटेखाणी घर आहे तिथेच आमची जेवणाची व्यवस्था कंधारे म्हणून एका स्थानिकाच्या घरी व्यवस्था केली होती.न्याहरी साठी काय आहे असे विचारले वर कंधारे यांनी तांदळाची भाकरी,मटकीची भाजी,भात बहुतेक लोकल शेतातील असावा,पापड,लोणचे असे सांगितले.टेबलावर बसलेला असताना शेजारी मस्त कोंबडा ,कोंबडी व त्यांची पिल्ले पाहून मनामध्ये मस्त गावरान चिकन भाकरी असती तर मजा आली असती असे वाटले पण नवरात्र असल्यामुळे बेत मनातच ठेवला इतक्यात समोर जेवणाचे ताट आले मनसोक्त ताव मारून मी कंधारेना विचारले ताक आहे का? पण काही म्हणा आपली ग्रामीण माणसे फार गोड त्याने सर्वाना पाहिजे का विचारले व सुंदर ताकाचा ग्लास सर्वाना दिला,बऱ्याच दिवसांनी इतके गोड व घट्ट ताक मिळाले होते आणि मनात आले खरंच त्या ठिकाणी बेड असताना अशी ताणून दिली असती ना उद्यापर्यंत झोपेतून उठलोच नसतो.

सहज कंधारे यांचे बोलण्यावरून ते शिक्षित वाटले म्हणून विचारले काय करता उत्तर ऐकून हायसे वाटले ते पंचशील कंपनीत स्थापत्य अभियंता म्हणून काम करत आहे असे सांगितले जेवणाबद्दल त्यांना चांगले जेवण होते म्हणून अभिप्राय दिला त्यांनीपण आभार मानले. झोप यायला लागल्यामुळे विशाल सरांनी गावातील एक मंदिर पाहू, चला असे म्हणताच झोपण्यापेक्षा चला मंदिर पाहू म्हणून निघालो. गावात राहला लोके कमी असु द्या पण मंदिर प्रशस्त पाहिजे .हिरडी एवढे छोटे गाव जेमतेम १० ते १२ घरांचे पण मंदिर मात्र मस्त दगडात वर कळस समोर पाण्याचे टाके त्याचं पायरी वर आताच शेंदूर लावला असा वाटत होते म्हणजे मला वाटले कोणीतरी रोज पूजा करत आहे .मंदिरात गणपती, तिथेल कोणी तरी देवमाणूस याचे दगडात कोरीव काम केलेल्या मुर्त्या होत्या मंदीर भाताच्या शेतात होते हे अजून एक वैशिष्ट.परत आलो सहज म्हणून कंधारेशी गप्पा मारताना त्यांनी सांगितले गावात पाऊस सुरु झाले पासून वीज नाही,आजच वायरमन आला आहे बघू वीज येते का? त्याचे बोलणे ऐकून अच्छे दिनच्या जाहिरातीची आठवण झाली जाऊ दे ‘No politics’. त्यामध्येच विषय निघाला त्यांना कोणतेही साहित्य आणण्याचे असेल तर २ ते ३ की.मी.चालत जाऊन डोक्यावर आणावे लागते गाडी आहे पण गावाला रस्ता नाही वाईट आणि आपण चाललो smart city कडे.मला गांधीजीचा संदेश खेड्याकडे चला एैवजी खेड्याकडे लक्ष देऊन त्यांना रस्ते विज व पाणी द्या असा पाहिजे से वाटले.

दुपारचे अडीच वाजला असेल गावातील लोकांना विचारले भिरा धरणापर्यंत जायला किती वेळ लागेल?आम्हाला २५ ते ३० मिनिटे पण तुम्हाला ३ ते ३.३० तास लागतील असे सांगितले पण उतार असलेमुळे काही नाही वाटले चालण्यास सुरुवात केली ,सर्व रस्त्यावर दगड असल्यामुळे खाली पाहून व पावले मोजूनच टाकावी लागत होती त्यातच मित्रांशी गप्पा मारत चेष्टा मस्ती करत निसर्गाचे विविधतेने नटलेली रूपे पाहत भिरा गावाकडे कूच करत होते.ऊन चांगलेच जाणवत होते खाली उतरत असताना सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.वाटे मध्ये विविध रंगबीरंगी फुले त्यावर खेळणारी फुलपाखरे तसेच जिकडून आली तो “independance point” ते पाच सहा उंच सह्याद्रीचे डोंगर कडे सभोवताली विस्तारलेली वनराई पाहत , स्वच्छ हवा घेत बऱ्याच वेळानी शेवटी गाडीचे आवाज, पाण्याचे आवाज एैकत भिरा धरणाचे दर्शन झाले मग पाऊले झपाझप धरणाच्या दिशेने चालू लागली बरोबर सव्वा पाचच्या दरम्यान भिरा धरणावर पोहचलो तेव्हा जरा मागे वळून पहिले तर मला ते उंच डोंगर पाहून आपली क्षमता व पहिल्या वहिल्या ट्रेकच्या सफलतेचे कौतुक वाटले व तोंडातून आपसूक आले जिंकलास मर्दा !!!!!!

Written By

Umesh Shidruk

Leave a Reply

Upcoming Activities

Velas Turtle Festival Eco Tour

Anjarle Turtle Festival Eco Tour

Recent Article

Facts about Velas Turtle Festival
February 28, 2019
एका भटक्याचं सुख
December 18, 2018
मुंग्यांच घरटे
September 26, 2018

Get a Question?

Do not hesitage to give us a call. We are an expert team and we are happy to talk to you.

+91 8983898528

sgtrekkers@gmail.com