(+91) 8983-8985-28 sgtrekkers@gmail.com
Harishchandragad Sadhale Ghat | Shubham Valunj | June 2017

Harishchandragad Sadhale Ghat | Shubham Valunj | June 2017

हरिश्चंद्र गड via साधळे घाट।
रविवार, २५ जून २०१७
खरंतर कोकण कडा बघितल्या पासून हरिश्चंद्र गडावर प्रेम झालं होत. प्रकृतीच इतक अफाट सौंदर्य जे कोणत्याही मनाला भुरळ घालेल मग प्रेम न होण्याच कारणच न्हवत. काही दिवसांनी असाच एक विडिओ पाहण्यात आला. तो होता हरिश्चंद्र गड via नळीची वाट. पाहताना अवघडच वाटला आणि तो आहेही मग म्हटलं की हा ट्रेक उन्हाळ्यात इतका अवघड वाटतोय तर पावसाळ्यात अजून अवघड होतं असेल. मग search करता करता मान्सून मधील ट्रेक चा देखील विडिओ बघितला. तेव्हा मनाशीच निश्चय केला की आपल्याला हा ट्रेक करायचाय, हा थरार अनुभवायचाय. परंतु दिवस, वेळ, तारीख काहीही निश्चित नव्हतं. त्याच्या साधारण एकाच महिन्यात इंटरनेट वर @sgtrekkers चा एक इव्हेंट सापडला आणि नाव वाचताच एक वेगळाच आनंद झाला “हरिश्चंद्र गड via नळीची वाट” मग डिटेल बघायला लागलो. त्यात कळलं की ट्रेक पुण्यावरून आहे, पण म्हटलं काहीही असल तरी हा ट्रेक करायचा. ट्रेक साधारण 4 दिवस आधी बुक केला. 4 दिवस खूप उत्साह होता मनात, थोडी भीती देखील होती की पहिला मोठा ट्रेक आणि तो देखील नळीच्या वाटेने, पूर्ण करू शकेन की नाही असा प्रश्नचिन्ह देखील होत. परंतु येथे प्रेम आणि उत्साहाने भीतीवर मात केली.

24 जून ला रात्री 11:30 वाजता शिवाजीनगर ला रेपोरटींग होत. साधारणतः 4 च्या सुमारास घरातून निघालो, 6:04 ची सह्याद्री एक्सप्रेस पकडायची होती दादर वरून. स्टेशन वर पोहोचलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. पावसाची भुरभुर चालूच होती . ट्रेन मध्ये चढल्यावर बसायला जागा नाही म्हणून सामानाच्या बाकड्यावर जाऊन चढलो. त्यात अजून एक इसम येऊन ठेपला मग म्हटलं ये वरतीच बस. थोडीफार ओळख झाली बोलणं झालं. तसा तो होता पुण्यातलाच. अपरिचित लोकांशी बोलण्याची कला एका प्रवाशाला चांगलीच अवगत असायला हवी. आणि तीच थोडी शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. 10 वाजता शिवाजीनगर ला पोहोचलो. ते पहिल्यांदाच पाहिलं. तसा पुणे जिल्ह्यातील असून देखील मी पुण्यात एवढा फिरलो नाहीये. अजून रेपोरटींग साठी दीड तास बाकी होता मग घरून आणलेला डब्बा खाल्ला आणि खूप शोधल्यानंतर सापडलेल्या चार्जिंग पोर्ट मध्ये चार्जेर लावून फोन ला चार्जिंग करत बसलो. रेपोर्टइंग करून बस मध्ये बसलो व गडाच्या पायत्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. तेव्हा Vishal Kakade da aani Omkar Yadav da ज्यांना मी फेसबुक वर आधीपासून त्यांच्या सह्यप्रेमामुळे follow करत होतो त्यांच्याशी प्रत्यक्षात भेट झाली.

सीट वर बाजूला एक व्यक्ती येऊन बसली. चार तासांचा प्रवास म्हणजे अनोळखी म्हणून प्रवास करणं जमनारच नाही मग कुठचे तुम्ही, काय करता म्हणून बोलायला सुरुवात केली. कुठेतरी ऐकल होत की तुमच्यात आणि एका अद्भुत व्यक्तीत फक्त संभाषण सुरू करण्या एवढा अंतर असत. आणि त्याचा प्रत्येय येथे आला. पुढे अनेक विषय निघाले . त्यांच नाव होतं Sandeep Chaugule 40 वर्षाचा हा इसम जवळपास 23 वर्षांपासून ट्रेकिंग करत होता. मग काय आवडीचाच विषय असल्यामुळे अनेक अनुभव जाणून घेतले.

मग उद्या गड चढायचा म्हंटल्यावर विश्रांती हवी म्हणून मग झोपावं ठरवलं पण पावसाच गार वातावरण आणि रस्त्याच्या बाजूने सर्व हिरवळ पाहत झोप विसरलो आणि एअरफोन कानाला लावून गाणी ऐकत ते सौंदर्य पाहत राहिलो. 4 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. पाऊस अजूनही चालूच होता. एक तास लवकर पोहोचल्या मुळे तो एक तास विश्रांती साठी मिळाला. मग बस मध्ये तर झोप येणार नाही म्हणून जवळच मारुतीच मंदिर होत तिथे जाऊन आरामात एक तासाची झोप काढली.

उठल्यावर गरम पोहे व चहाचा नाष्टा केला. त्यानंतर छोटा introduction राऊंड झाला तेव्हाच विशाल दादा ने सांगितलं की पाऊस जास्त असल्यामुळे नळीच्या वाटेवर पाणी खूप वाढल असल्यामुळे आता त्या रस्त्याने न जाता साधळे घाट या रस्त्याने जाणार आहोत व तो डीफिकल्टी च्या नजरेत तेवढाच अवघड आहे. थोडाफार फरक आहे आणि अर्ध्या वाटेवर तो नळीच्या वाटेला जाऊन भेटतो. म्हणजे शेवटचे 2 रॉक patch मिळतील.

आणि एकूण 31 सह्यवेडे त्या स्वर्गाच्या दिशेने पावले टाकत निघाले. अंगात स्फूर्ती शक्ती आणि उत्साह दाटून भरलेला आणि नजर फक्त गडाच्या माथ्यावर त्या बलाढ्य कोकण कड्यावर. रस्त्यात अनेक मन मोहून टाकणारे धबधबे ते ओलांडताना नकळत घसरणारा पाय, ते सह्याद्री चे दगड धोंडे आजूबाजूची दाट हिरवळ व सतत चालू असलेला पावसाचा वर्षाव अस सगळंच अनुभवत एक एक पाउल पुढे पडत होते. तीन साढे तीन तासांनंतर थकवा जाणवू लागला पाय दुखण्यास सुरुवात झाली. परंतु थांबायची इच्छाच होत न्हवंती. अंगात एक वेगळीच उर्जा सॅंचारली होती. पाय जणू थांबतच न्हवंते मध्ये थोडे थोडे थांबे घेत पहिल्या रॉक patch पर्यंत पोहोचलो. आणि समोर दिसला ते सह्याद्रीच रौद्र रूप. तो बलाढ्य पणा ते दृश्य डोळे भरून पहिल व न राहवता तिथून शिवगर्जना दिली. जय भवानी जय शिवाजी चा जयघोष जणू आसमंताला भिडला आणि मग पाऊस चालू असतानाच फोन बाहेर काढला व ती दृश्य टिपायला सुरुवात केली. पहिला रॉक patch रोप च्या साहाय्याने चढलो व त्यानंतर साधारण एक तास अजून चालल्यानंतर दुसरा रॉक patch पर्यंत पोहोचलो तो चढल्यानंतर थोडे पुढे गेल्यावर जे दृश्य ह्या डोळ्यांनी पहिल त्याच शब्दांमध्ये वर्णन करूच शकत नाही. तो भव्यदिव्य कोकणकडा त्यावर ती धुक्याची चादर आणि ढगांच्या वर दिसणारा तो गिरिदुर्ग. सर्वकाही इतकं आरस्पानी सुंदर. शिवाजी सावंत लिखित छावा मध्ये त्यांच्या शब्दात जीवनातील काही घटनाच अशा असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे ठरते याचा प्रत्येय देणारे ते दृश्य होते.

तिथून निघून कोकणकड्याकडे जाताना वाटेत लहान धबदबा दिसला. न राहवून त्या बर्फा सारख्या थंड पाण्यात जाऊन मनसोक्त भिजलो. एखाद्या लहान मुलाप्रमाणे सर्व काही विसरून फक्त त्या क्षणाचा मनभरून आनंद घेतला. आता वेळ झाली होती दुपारच्या जेवणाची. प्रचंड भूक लागली होती. तेथील एका गुहे मध्ये जेवणाची सोय केली होती. गरम गरम पिठलं भाकरी आणि वरण भात दाबून खाल्ला त्याबरोबर लोणचं आणि ठेचा यांची जोड. पोटात आता जागाच उरली नव्हती. मग सगळ्यांचे जेवण उरकल्यावर खालती हरिश्चंद्रश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेलो, ते मंदिर म्हणजे पुरातन शिल्पकलेचा एक सर्वोच्च नमुना. दगडात कोरून बनवलेल सुरेख रेखीव शिल्प.

तो सगळा परिसर पाहील्यानंतर मंदिराजवळ एक ग्रुप फोटो काढला व पावले वळली परतीच्या वाटेकडे. खिरेश्वर च्या वाटेने आता आम्ही खाली उतरणार होतो. खरंतर परतिची वाट नेहमीच न आवडणारी असते. परंतु ते अनमोल क्षण आठवणीत जपून, सोबत घेऊन जायचे असतात पुन्हा एका नव्या पर्व्हाच्या शोधात. उतरताना जे वाटेला लागलो ते मध्ये थांबलोच नाही . जवळ जवळ २ तास १२ मिनिटांमध्ये गड उतरलो. पाठीवळून त्या गिरीदुर्गाला शेवटचा निरोप दिला. पुन्हा भेटण्याचे वचन दिले आणि आता बस ला शोधू लागलो. सगळे जण खाली उतरण्यास साडे तीन तास लागले. तेथील एका हॉटेल मध्ये गरम गरम चहा घेतला आणि सर्व आठवनिंचे गाठोडे बांधून घरी परतण्यासाठी सगळे बस मध्ये बसले. पुन्हा पुण्यात जाऊन मग मुंबई ला परतण जरा जास्त लांबल असतं त्यामुळे omkar दादा ने सल्ला दिला के खुबी फाट्यावरून लाल डब्बा मिळेल मग खुबी फाट्यावर सर्वांचे निरोप घेऊन बसमधून उतरलो. रस्त्यात मुंबईला जाणारे दोघे जण मिळाले होते. मग त्यांच्याबरोबर स्टँडवर जाऊन थांबलो. साधारण अर्ध्या तासात कल्याण साठी लाल डब्बा मिळाला. तोपर्यंत पाय एवढे दुखायला लागले होते की बसायला देखील होत नव्हतं. पकल्याण पर्यंत चा प्रवास 3 तासांचा होता. थकव्यामुळे बसल्या बसल्याच डोळा लागला. 10 च्या सुमारास कल्याण ला पोहोचलो तेथून लोकल पकडून घाटकोपर पर्यंत गेलो व नंतर मेट्रो ने वर्सोवा पर्यंत. घरी पोहोचताच गरम पाण्याने अंघोळ करून न जेवता बिछान्यावर पडलो…

अशा प्रकारे आतापर्यंतच्या सर्वात कठीण, अविस्मरणीय आणि सुंदर ट्रेक चा शेवट झाला. ट्रेकिंग organisers बरोबर केलेला हा पहिलाच ट्रेक. @sgtrekkers बरोबर हया प्रवासात खूप मज्जा आली. त्यांच management आणि support सुरुवातीपासून शेवटपर्यंत अप्रतिम होत. Thanxz Vishal Kakade Da, Omkar Yadav Da आणि Yadnesh Da. हा अनुभव खूपच भन्नाट होता. अनेकांच्या सह्यप्रेमाचे भटकंतीचे किस्से ऐकायला मिळाले. व पुढील प्रवासासाठी आणखीन प्रेरणा मिळाली. खरंतर प्रत्येक प्रवास माणसाला काही न काही नवीन शिकवतो. नवनवीन आठवणी देतो. निर्भीड बनवतो आणि आपल्या अंतर्मनाच्या आपण अजून जास्त जवळ जातो. खरच ह्या प्रवासानंतर आयुष्याचं आणखी एक पान सुवर्ण क्षणांनी भरले गेले.
-shubh valunj

FOLLOW US ON FACEBOOK

Username: @sgtrekkers.in

Harishchandragad Nalichi Vaat-Bail Ghat-Tolar Khind | Swapnil Barde | Sep 2017

Harishchandragad Nalichi Vaat-Bail Ghat-Tolar Khind | Swapnil Barde | Sep 2017

About Last Sunday 24/09/2017

Few Lines about our trek-#Harishchandra_Fort Trek.
Yes, it’s a most awaited trek for me bcoz of I heard lots of about Harishchandra Gad trek via #Nalichi_vaat.
It turned out to be the most difficult path chosen with an 80 Degree climb, involving steep rock patches..,
Mainly tough endurance so it required a lot of physical stamina. Where the need to walk long miles…
From Pune we r Reached to Belpada Village (Old Name) or Walivare (Some says) @ 5 AM Sunday early Morning..then after Breakfast, we r headed towards the Nalichi(नळीची) Vaat.
After that we climb down from Nalichi Vaat to another base i.e Sadhale Pathar & BailGhat it’s little bit Jungle Road so our Jungle Trek dream also completed here and we r once again climbed up to KokanKada via तटबंदी.. #KokanKada is the best Place on Fort.. everyone amazed after watching KokanKada Beauty.
After all Climbing & Long Walk all hungry faces ready to attack food. The Lunch was delicious & Tasty.. चुलीवरील Zunaka Bhakri ( पिठलं भाकरी), Potato Usual mix Bhaji, Dal Bhat..but it’s already late bcoz it’s 6 PM on the clock & we have to climb down to base Village.

And we r ready for our 1st Night 🌃 Trek.Millions of stars have opened their wide arms to welcome us…
We choose Tolar Khind route for Descend… Finally Reached to another Base village Khireshwar.. @ 1 AM of Monday morning.
Nd its End of Unstoppable 19 hrs of trekking.
This is one of the best treks I had ever been…
With full mast, full adventure and thrill; the awesome trek comes to end with unforgettable memories in mind and as usual with the new friend.. thanx unknown people..!! & thanx to SG-Trekkers for this Indescribable Trek. 😘
#Trek_Guides – Rahul B Awate Rupesh Gaul, Bhagyesh & Sandeep Sadanand Chaugule sir
#Pic_courtesy – Vishal Khatri, Nilesh, Vishal Ghatge & Er Swapnil Barde
#Treklife #LoveTrekking #KeepHiking
🏞 🏔 🌃 🌌 🚶 😘 ✌ ⛄

FOLLOW US ON FACEBOOK

Username: @sgtrekkers.in

Bhimashankar Via Shidi Ghat | By Mayuri Dhodapkar | Sep 2017

Bhimashankar Via Shidi Ghat | By Mayuri Dhodapkar | Sep 2017

#Unforgettable #Memories4life
Bhimashankar Via Shidi Ghat 03rd Sept 2017
A pristine place with hundreds of waterfalls all along the trek and splendid natural beauty will leave you awestruck. This was one more trek on my To Do List since long. Last year I had done Bhimashankar via Bhorgiri. This year I was ready for a more challenging one and opted for this. Basically, this place is so beautiful that just the thought of it refreshes me. I have been going to Bhimashankar once in the rainy season since last 3 years. It’s a religious place with jyotirlinga and Shiva temple but what keeps you calling especially in monsoon is the foggy jungle and the beautiful natural surroundings.

Leaving from Pune at midnight we started the trek at around 07:30 AM. The weather was wonderful. It was drizzling most of the time. We were a major Girl Gang for this trek. This trek was quite challenging as expected. The ascend via Shidi ghat was quite steep at places and we had to use the rope at 1 point. Rest places we managed to do it without the rope. Descend via Shidi (Ladder)for me is an impossible task. I simply cannot think of going down this way. Ganesh Ghat is a little longer route than Shidi but it’s a much safer route. My suggestion for all non-technical people-please doesn’t descent via Shidi Ghat. We descended and were back around 07:30 PM. It was a long day and a challenging path – 12 hours of the trek along with the revival breaks we took in between. A day well spent.
#TodaysMoments2morrsmemories.
PC-Team-SGTREKKERS

FOLLOW US ON FACEBOOK

Username: @sgtrekkers.in

SRT Range Trek – By Paresh Pevekar

SRT Range Trek – By Paresh Pevekar

Every person has a dream in life and tries hard to complete. I always wanted to be part of something that will give me a lifelong experience, in today’s world of urban lifestyle and work culture everyone looks for some space away from all this. And this one is my space, go take a hike in nature’s paradise.
This is about recent range trek I experienced to Sinhagad – Rajgad – Torna and thanks to SG Trekkers for having this planned. Mr Vishal Kakade, a trek leader is been a young energetic person throughout. The team had 8 of us from different fields and different locations as well.

The Journey started on early morning of Saturday 12th Nov’16 near Shaniwar Wada in Pune by public transport (PMT) vehicle to Sinhagad base village named Aatkarwadi. After paying condolence to Sir N. K. Mahajan (known as Aabasaheb) for few minutes for his journey and dedication towards hiking and sports, we started climb to The Lion’s Fort Sinhagad. It took us 50-60 minutes to climb and reach at Entrance of the Fort Sinhagad. During a breakfast, we were entertained by Marathi Powada young Artists who narrated a poetic story of Sinhagad about Tanaji Malusare (A brave leader of Maratha Army who gave his life for his king Maharaj Shivaji Bhosale during war at Sinhagad, which is named as Sinhagad after Tanaji Malusare, previously called as Kondhana).

After breakfast, we started our expedition towards Fort Rajgad via Kalyan Darwaja   (Sinhagad). A walk over the paths of small mountains range of Sahyadri made everyone exhaust and joyous at same time. An unfortunate incident happened during Sinhagad to Rajgad was only girl of the group fell down on face and got injured. But in-spite of her injury she showed utmost courage to continue journey without any regret, the bravest of all. We almost took night to reach base village of Rajgad called Gunjavane and had dinner at Hotel Sanjeevani.

Every one of us was tired walking and crossing peaks & valleys of the Sinhagad to Rajgad track, but were happy to finish in time and on schedule. Previously it was planned to continue to the top of Rajgad and take a rest but we all decided to stay back at base and start early morning to climb Rajgad. So, we took a halt at Village temple and slept peacefully.

With sound of alarm at 3:30 in morning everyone woke up and even had a small bonfire to warm up bodies from chilling winter. The climb to Rajgad started around 4:30-5:00 AM. On our way to top, we had nice views of sunrise at Suvela Machi which made us stop and capture few clicks. When we reach top through Chorta Darwaja (being small in size to enter it is named as Chorta Darwaja i.e. Small Entrance Door), we were welcomed by monkeys at Padmavati Machi. Everyone took a break and captured photos at Entrance, Padmavati lake, and at Flag on Entrance.
Reaching top makes everyone gain lost energy again to do journey ahead. We all had tea break at Padmavati Temple and wrapped up early, since we had to start towards Fort Torna. The Journey to Fort Torna started from Sanjeevani Machi and after few clicks at Fort Rajgad.

Here starts the second part of our expedition, Rajgad to Torna. By now, the only (injured) girl from the group was back in form and started giving poses for selfies. While crossing Rajgad to Torna, there is a small house where we enjoyed our lunch (Khichadi). Being highest fort in Pune region (4603 ft.), Torna made everyone tired and took us whole day to complete. We reached at the Torna top by 6:00 PM in evening and also got to enjoy Sunset from highest fort of Pune. After a small tea break at Torna, we started descending towards base village Velhe. Around 9:00 at night we were eating our dinner at Torna base village Velhe and started our journey back to Pune.

It was an amazing journey from Sinhagad to Rajgad to Torna. Past two days of this range trek we experienced many parts of life; Joy, Pain, Journey, and most importantly a reason to live for exploring best part of Nature. It may have exhausted everyone of us, but at the end we were happy to finish it in two days and with 51kms of walk through the beautiful range of Sahyadris.
“We all have to follow our hearts and we did!”
THANK YOU!
READ ORIGINAL BLOG AT: 
www.pareshpevekar.blogspot.in/2016/12/SRT12th-13thNov2016.html
गवसणी कळसूबाई शिखराला…!! – By Ravi Inamdar

गवसणी कळसूबाई शिखराला…!! – By Ravi Inamdar

तसं तर कळसूबाई शिखराची एक अंतरीक ओढ लहानपणा पासूनच मनात होती. इयत्ता ४ थी भूगोलाच्या पेपरात हमखास विचारला जाणारा प्रश्न – “महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि त्यांची उंची किती?” उत्तर आम्हाला तोंडपाठ असायचं “महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि उंची १६४६ मीटर” बाकी आता ते नेमकं महाराष्ट्रात कुठे आहे पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला की उत्तरेला हे काय आम्हाला ठाउक नव्हतं..!! तेव्हा पासूनच कळसूबाई शिखर हे मनात घर करून होते. या शिखराला सह्याद्रीचं एव्हरेस्टदेखील म्हणतात. अश्या या कळसूबाई शिखराला गवसणी घालायचा योग २० डिसेंबर २०१५ ला जमून आला तो ही SG Trekkers मूळे, त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार, आणि विशेषत: विशाल काकडे याचे..!!

पुण्याहून कळसूबाईच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला तो शनिवार १९ डिसेंबर २०१५ च्या रात्री १०.३० वाजता. बस मध्ये प्रवासात गप्पा-टप्पा, दंगा-मस्ती, गाण्याच्या भेंड्या खेळत-खेळत रात्री २ ते २.३० च्या सुमारास आम्ही कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या ‘बारी’ या गावात येउन पोहोचलो. गावातील एका मंदिरात थोडा वेळ विसावा घेतला. जवळ पास २५ ते ३० जनांचा ग्रुप होता आमचा. नेहमी प्रमाने प्रत्येकाने आप-आपला परिचय आणि थोडक्यात या पूर्वीच्या ट्रेकिंगचा अनुभव देखिल शेअर केला. ज्योती कारंडे यांनी नुकत्याच जाउन आलेल्या आणि प्रत्येक ‘हार्ड कोअर ट्रेकरचे’ स्वप्न असलेल्या ‘A.M.K’ (अलंग, मदन आणि कुलंग) ट्रेकचा खूप छान अनुभव शेअर केला होता. पाहू आता आमचा AMK चा योग कधी जूळून येतो ते…!!  मंदिरा जवळील एका घरात चहा आणि नाष्ट्याची उत्तम सोय करण्यात आली होती. गरमा-गरम चहा आणि पोह्यावर यथेच्छ ताव मारून ३ ते ३.३० च्या सुमारास कळसूबाई शिखर मोहिमेची सुरवात झाली.

डिसेंबर महीना असल्याने थंडीचा कडाका तर चांगलाच होता, या बोचऱ्या थंडीत कसं आणि काय होणार ट्रेकचं असचं वाटत होते. पण एकदा भर-भर चालायला सुरवात केल्यावर पहिल्या अर्ध्या तासात थंडी कुठच्या कुठे पळून गेली काही कळलच नाही. ट्रेक फ्रंट लीडला विशाल होता आणि बेक एंड ला आलेख होता, मध्ये मी आणि भगवान चंगू-मंगू ? आणि बाकीचे सर्वजण..!!

पहाटेच्या त्या नीरव शातंतेला भंग करणारी रातकिड्यांच्या कीर-किर, आमच्या सर्वांच्या बोलण्याचा आवाज, सोबतीला असंख्य चांदण्याचा शीतल प्रकाश आणि समोरच्या पाय वाटांवरचा काळोख चिरणाऱ्या आमच्या सर्वांच्या हातातील भीर-भीरणाऱ्या टॉर्चची लाईट..!! असा एकंदरीत अप्रतिम नजारा होता?.  खाली पाऊल वाटांवरच्या दगड धोंड्यांकडे लक्ष देत आणि वरती आभाळातील अगणित चांदण्यांना निरखत आमचा मार्गक्रमण सुरु होता. वातावरण इतके स्वच्छ होते की आकाशगंगेतील छोट्या-छोट्या चांदण्या देखिल अगदी स्पष्ट दिसत होत्या. शहरात कुठली आलीये असली पर्वणी म्हणूनच असं आड-वाटांवरील भटकंती मनाला अगदी स्पर्षून जाते..!!

कळसूबाई शिखराला प्रामुख्याने तीन ते चार मोठ्या-मोठ्या लोखंडी शिड्या आहेत, त्या शिड्या जरा हलत्या आणि काही ठिकाणच्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या अस्वथेतल्या आहेत त्या मूळे अगदी बेताने आणि निरखून असा आमचा मार्गक्रमन चालू होता. ‘बारी’ गावातून कळसुबाई शिखरावर पोहोचण्या साठी साधारणत: तीन तासाचा अवधी लागतो. पहिल्या दोन शिड्या पार केल्यावर थोडा वेळ विश्रांती घेउन पुन्हा कळसूबाईच्या दिशेने आम्ही आगेकूच केली…!!

आडिच-तीन तासाने आम्ही बऱ्यापैकी कळसूबाई ट्रेक च्या उत्तरार्धात पोहोचलो होतो. शेवटच्या एक दोन शिड्या आम्ही जरा घाई घाईने चढ़ल्या कारण आम्हाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरून सुर्योदयाचा तो अप्रतिम नजारा पहायचा होता. शिखराची शेवटची चढण जरा अवघडच होती इतर सर्व चढणीच्या मानाने. आम्हा सर्वांची लगबग चालू होती आणि इकडे नेहमी प्रमाने सूर्यदेव आपल्या नित्य नियमाच्या ड्युटी वर येण्याच्या मार्गावर होते, गावरान भाषेत सांगायचं झालं तर ‘तांबडं फूटण्याचा तो काळ’ अश्या प्रसन्न प्रात:काळी महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवरून अवती-भवतीचा नवचैतन्याने बहारलेला अजस्त्र आणि रांगडा सह्याद्रि न्याहाळताना एका वेगळयाच आनंदलहरींचा संचार मानत होत होता..!!

सहा ते सव्वा सहाच्या सुमारास आम्ही सर्वजण कळसूबाई शिखरावर पोहोचलो. आणि आम्हाला हवं आसलेला सूर्योदयाचा अभुतपूर्व नजारा डोळयात, मनात आणि कैमेरात टिपत होतो..!! खरचं खुप मनमोहक नजारा होता तो. दिवसभर आग ओखणाऱ्या सूर्य-नारायणांची ती एक वेगळीच छटा..!!  सर्वजण तो नजारा पाहण्यात कसे अगदी दंग होउन गेले होते..!! Mind Refreshment आणि Mind Relaxation म्हणजे काय? ते नेमकं हेच असावं बहुदा..!!

कळसूबाई शिखरावरती ‘कळसूआईचे’ एक छोटसं आणि छानसं मंदिर आहे, जेम-तेम तीन-चारजण आत बसतील एवढसं. कळसूआईचे दर्शन घेउन, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराला गवसणी घातल्याचे एक वेगळचं समाधान मानत येउन गेलं..!! कळसूबाई मंदिराच्या अवती-भोवती थोडीशी विस्तीर्ण जागा आहे आणि आजुबाजुने संरक्षक लोखंडी रेलिंग आहेत. समोरच भंडारदऱ्याचा प्रचंड असा पसरलेला जलाशय आहे, पूर्वेला अलंग,मदन,कुलंग आणि हरिश्चंद्रगड  दृष्टीक्षेपात पडतो अणि अवती-भोवतीचे सह्याद्रिचे कातळकडे, सुळके डोंगर रांगा लक्ष वेधून घेतात.

आम्ही बराच वेळ शिखरावरुन आजुबाजूचा निसर्ग आणि सह्याद्रिच्या लांबच-लांब पसरलेल्या पर्वत रांगा न्याहाळत होतो. आणि मनमुराद फोटोग्राफिचा आनंद लूटत होतो. नेचर फोटो, ग्रुप फोटो, सेल्फी, सोलो पिक आणि ज्याला जसे योग्य वाटेल तश्या त्या सर्व आठवणी कैमेरात कैद करत होते..!! सविता मैमचा मी क्लिक केलेला एक फोटो त्यांना खुप आवडला. त्यानी खुप कौतुक ही केलं. थोरा-मोठ्यांकडून अश्या प्रकारचं कौतुक म्हणजे आपल्या छंदाला दीलेलं एक प्रोत्साहनच नाही का..!!

साडे ९ ते १० च्या सुमारास आम्ही शिखरावरून खाली उतरण्यास सुरवात केली. पहिल्याच उतरणीनंतर एक विहीर लागली, तेथील थंडगार पाणी प्राशन करून एक-एक करत लोखंडी जीणे उतरायला सुरवात केली. दोन आडिच तासात आम्ही खाली ‘बारी’ गावात पहोचलो.!!

गावातून परतत असताना वाटेत एका जागी भोजन उरकून पुण्याचा रस्ता पकडला. महाराष्ट्रातील एव्हरेस्टला गवसणी घातल्याचा एक वेगळाच आनंद त्या संपूर्ण परतीच्या प्रवासात ओसंडून वाहत होता..!!

आनंद कळसूबाई शिखराला गवसणी घातल्याचा,
आनंद लहानपणीच्या स्वप्नांना गवसणी घातल्याचा..!! ✌✌

✒ रविंद्र इनामदार 

? थोडीशी उपयुक्त माहिती:-
ठिकाण – कळसूबाई शिखर
पायथ्याचे गाव – बारी
समुद्र सपाटी पासूनची उंची -१६४६ मीटर
ट्रेक दिनांक – २० डिसेंबर २०१५
पोहचण्याचा मार्ग
पुण्याहून :- नारायणगाव – आळेफाटा – संगमनेर – आकोले – राजूर – बारी
एकूण अंतर १७० किमी.
मुंबईहून :- कसारा – इगतपुरी – घाटी – बारी
एकूण अंतर १५५ किमी.
जवळचे प्रेक्षणीय स्थळ – भंडारदरा (शेंडी गाव)
एकूण अंतर १० किमी बारी गावापासून.

हरिश्चंद्रगड :- नळीच्या वाटेने..!! – By Ravi Inamdar

हरिश्चंद्रगड :- नळीच्या वाटेने..!! – By Ravi Inamdar

कदाचित आम्हीच ते जगावेगळे नमूने असू जे भारत पाकिस्तान T20 World Cup ची Live हाय व्होल्टेज मैच बघायची सोडून गडकिल्ले आणि दुर्ग भटकंतीला निघालो होतो…..
असं म्हणतात की, “मार्ग जितका अवघड आणि खडतर आसतो तितकच यशप्राप्तिच सुख हे मोठ आणि गोड असत” आणि खरोखरच याची प्रचिती ९ तासाच्या अखंड आणि अथक ट्रेक नंतर हरिश्चंद्रगडावर आणि विशेषत: कोकणकड्यावर पोहोचल्यावर आली.

जेव्हा २ महिन्यापूर्वीच ‘SG Trekkers’ सोबत हरिश्चंद्रगडावर खीरेश्वर, टोलारखिंडमार्गे गेलो होतो तेव्हाच खऱ्या आर्थाने हरिश्चंद्रगडाच्या आणि तेथील निसर्ग सौदर्याच्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा ऐकलं होत की ‘नळीच्या वाटेने’ हरिश्चंद्रगड हा खूप अवघड पण भारी ट्रेक आहे. आणि तेंव्हाच ठरवूनही टाकल होत की पून्हा हरिश्चंद्रगड करायचाच आणि तो ही नळीच्याच वाटेने. आणि तो योग लवकरच जूळून आला, “SG Trekkers” च्या ‘विशाल’ ने “नळीच्या वाटेचे” ट्रेक शेड्यूल Plan केल्या-केल्या लगेच सांगून टाकलं “भावा, आपण तर आहे बघ ट्रेक ला”…..!!

शनिवारच काम गुडाळून संध्याकाळी थोडी लवकरच कामावरून कल्टी मारली आणि पटापट अवरा आवर करून धावत पळत नाशिकफाटा जवळ केला. तेथे ऑलरेडीच ‘मिलिंद’ आणि ‘रुपेश’ पोहोचले होते. नेहमी माझ्या सोबत असणारा माझा जिवलग मित्र ‘भगवान’ या वेळी मात्र शिवाजीनगरहून त्यांच्या सरांसोबत येत होता. साडे-आठ नऊ च्या सुमारास बस नाशिकफाट्याला आली. नंतर पुढे वाटेत ‘भोसरीतुन’ सर्वात शेवटी माझे सहकारी मित्र ‘पुरुषोत्तम’ यांना लास्ट पिकअप करून ‘हरिश्चंद्रगडाच्या’ दिशेने मार्गस्थ झालो…!! आणि मग सुरु झाला तो आमचा प्रवास ‘स्वप्नांच्या दिशेन’, ‘स्वप्नातल्या वाटेच्या दिशेने’….!!
या ‘भटकंती’ साठी जवळ पास २५ ते ३० ‘हौशी भटक्यां’ मेळा जमला होता. यात बऱ्यापैकी तरुण वर्गा पासून ‘शिदोरेकाकांसारखे’ साठ-पासस्ट च्या घरातील सेवानिवृत्त अनुभवी आणि चिरतरुण असं व्यक्तिमत्व ही सोबत होतं.
प्रवासात नेहमीप्रमाने गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या, आणि बघता सगळे त्यात अक्षरश: रमून गेले. आणि त्यायच भर म्हणून की काय तर, “अप्सरा आली” या गाण्यावर ‘किरन’,’स्मिता’ आणि ‘सिद्धी’ यानी केलेल्या नृत्याविष्काराची हलकीशी झलक तर अप्रतिमच…!! खरचं कलेची एक ‘खास देण’ लाभली आहे त्यांना..!!
आणि शेवटी ‘शिदोरेकाकांनी ” वाजले की बारा” या लावणीवर धरलेला ठेका पाहूनतर “शिट्या” मारन्याचा मोह आवरता आला नाही…..!!!!
नारायणगाव जवळ चहा-पानासाठी थोडा थांबा घेतला. आगोदर आठवडाभर मस्का मारल्यानंतर सिद्धीने मस्तपैकी ‘साजूक तुपातला शिरा’बनवून आणला होता. (आणि तो हि एका Cadbury च्या बदल्यात बरं का)  चहा-पानाचा कार्यक्रम उरकून पुन्हा प्रवास झाला. योगायोगाने बसमधे Radio होता आणि त्यावर ऐकलेली Live Commentary व सोबत केलेला जल्लोष….!!
आणि तीच जुनी पण भूतकाळातील रम्य बालपण डोळयासमोर आणनारी Tune….!!
“ये लगा BSNL चौका Connecting India….!!”
वाह क्या बात है… अविस्मरणीयच…!!!

जवळपास रात्रीच्या आडिच वाजता आम्ही ‘कोकणकड्याच्या’ पाठीमागे पायथ्याशी असणाऱ्या ‘बेलपाडा’ गावात पोहोचलो. नव्या जुन्या सर्व मंडळींनी आप-आपला परीचय करून दिला. ‘राहूल’ आणि ‘मिलिंद’ ने संपूर्ण ट्रेकची एकंदरीत रूपरेषा समजावून दिली.
पहाटे साडेतीनच्या सुमारास गावातील एका वाटाड्याला सोबत घेउन आम्ही नळीच्या वाटेच्या दिशेने मार्गस्थ झालो. नळीची वाट म्हणजे तरी नेमक काय ओ ??? तर, “कोकणकड्यावरुण वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रचंड लोटाने कोरलेली एक बिकट आणि अनवट वाट”……!!
गावातून बाहेर पडत असताना भूंकनाऱ्या कुत्र्यांमुळे पहाटेच्या त्या नीरव-शांततेला कुठेतरी तडा जात होता. माळराणातुन चालताना वाटेतील आजुबाजूच्या नुकत्याच बहरलेल्या करवंदीच्या फुलांचा दरवळणारा सुवास तर अगदी एखादया कीमती अत्तरा सम भासत होता. अर्ध्या पाउन तासाच्या पायपिटीनंतर कोकणकड्याच्या अगदी पायथ्याशी पोहोचलो. आणि आता येथून पुढे लागणार होता तो आमचा खरा कस…!!
वाटेत असणाऱ्या मोठ्या मोठ्या शिळांमुळे नळीचीवाट ही खुपच बिकट आणि खडतर होत जाते. या वाटेत प्रामुख्याने कठिन आणि जवळपास १५ ते २० फुटांचे सरळ उभ्या चढनिचे ‘चार’ Rock Patches आहेत. यासाठी प्रस्तरारोहनाचे सुरक्षा साहित्य (Rock Climbing safety tools) सोबत असणे हे आवश्यकच. साडेपाच सहा च्या सुमारस पहिला Rock Patch अगदी नियोजनबद्धरीत्या पार केला. पहिल्या आणि दुसऱ्या Rock Patch मधे तसं अंतर फारसं कमीच आहे. तो Rock Patch ही आम्ही अगदी आखीव सुसूत्रतेने पार केला, यात मोलाचा वाटा होता तो ‘राहुल’ ‘मिलिंद’ आणि ‘दीपकचा’….!! “भावांनो, तुमचे Efforts हे खरोखरचं उल्लेखनिय…!!

आता या दोन Rock Patch नंतर पोटात चांगलेच कावळे ओरडायला लागले होते. पुण्याहुन निघतानाच सर्वांनसाठी पार्सल नाष्टा सोबत घेतला होता. ‘मेथी पराठे आणि लिंबाचं लोणचं’ असा फक्कड बेत होता नाष्ट्याला. यासाठी ‘सिद्धीचे’ विशेष आभार असा छान मेन्यु अरेंज केल्याबद्दल. सह्यकडयांच्या सानिध्यात त्यावर मस्तपैकी ताव मारून आम्ही तिसऱ्या Rock Patch कड़े आगेकूच केली.
कोकणकड्याच्या कातळकड्यातुन आणि कड्याकपारीतुन मार्गक्रमण करीत असताना सभोवती दिसणाऱ्या या ‘उंचच-उंच गगनभेदी’ आणि ‘अतिप्रचंड’ अश्या कातळकड्यांकडे पाहून ‘कविवर्य’ ‘वि.दा. करंदिकरांच्या’ कवितेतील दोन ओळी चटकन मनात येउन गेल्या….
” हिरव्या पिवळ्या माळावरून”
हिरवी पिवळी शाल घ्यावी !
“सह्याद्रीच्या कड्याकडून”
छातीसाठी ढाल घ्यावी…!!

तिसऱ्या Rock Patch जवळ पोहोचल्यावर सोबत असणाऱ्या ‘वाटाडया’ आणि ‘राहुल’ ने अगदी कौषल्यपूर्णरित्या या Rock Patch वरती जाऊन रोप एका घट्ट ठिकाणी बांधला, आणि याच रोप चा आधार घेत एक-एक करून हळू हळू सर्वजण वरती पोहोचलो. या  Rock Patch ने तर आम्हा सर्वांचा चांगलाच घाम काढला होता राव. मागील दोन-तीन Rock Patch च्या यशस्वी चढ़णीने बऱ्यापैकी सर्वांना चांगला Confidence आला होता. आणि त्यामुळेच चौथ्या रॉक पैचचा इतका त्रास जाणवला नाही…

उन्हाची कोवळी कीरणे कधीच निघून गेली होती आणि आता सूर्य बऱ्यापैकी तळपायला लागला होता त्यामुळचे अंगाची लाही-लाही होत होती. साडे-अकरा बाराच्या सुमारास आम्ही एकदाचे कोकणकड्यावर  पोहोचून सुखावलो….!!

कोकणकड्याचे ते ‘अजस्त्र’ आणि ‘रौद्ररांगडे’ रूप डोळयात साठवून, थोडा फोटोंचा मनमुराद ‘क्लिक-क्लिकाट’ करून कोकणकड्यावरील ‘भास्कर दादांची’ ‘टुमदार झोपडी’ जवळ केली. दोंहपारच्या जेवणाचा झक्कास बेत तेथे आखला होता यात मेजवाणीला ‘गरमागरम कडी’, ‘बाजरीची कडक भाकरी’, ‘मिक्स व्हेज’ ची भाजी सोबत झंझणीत ‘हिरव्या मिरचीचा ठेचा’ आणि घमघमित सुवासाच्या ‘इंद्रायणी तांदळाचा भात’ आणि शेवठी गावरान फ्रीज (माठ) मधील थंडगार पाणी, मगं काय ‘आत्मा तृप्तच’….!!! आणि आता येवढं समधं भरपेठ खाल्लयं म्हणल्यावर ‘वामकुक्षी’ शिवाय पर्यायच नव्हता…..!!

थोडया विश्रांतीनंतर परतीच्या मार्गाने खाली परतताना गडावर थोड़ी भ्रमंती करीत ‘हरिश्चंद्रेश्वर’, ‘श्री गणराया’ आणि ‘केदारेश्वराच्या’ भव्य शिवलिंगाला नमस्कार घालून टोलारखिंडीची पकडली.अडीच तीन तासात खाली खिरेश्वर गावात पोहोचलो.

आमचा नेहमीचा म्होरक्या असनाऱ्या ‘विशालची’ प्रकृती थोडी बरी नसल्याने तो आम्हाला रात्री ‘बेलपाड्यात’ पोहोचवून दुसऱ्या दिवशी ‘खिरेश्वर’गावात आमची वाट पाहत होता. “विशाल, या संपूर्ण ट्रेक मध्ये भावा तुला खुप मिस केलं रे”….!!
संध्याकाळचा सूर्य बऱ्यापैकी मावळतीला पोहोचला होता, क्षितीजकडा लालच लाल झाली होती आणि आता आमचा पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला होता. रात्री अकरा साडे अकरा सुमारास सर्वांना निरोप देऊन चिंचवड ला पोहोचलो…
१४ – १५ तासांच्या अखंड आणि खडतर ट्रेक मुळे पायांच्या अक्षरश: खूंटया झाल्या होत्या, आणि संपूर्ण शरीर वेदनेने किंचितसे विव्हळत होत. पण मनाला मात्र त्याच काहीच वाटत न्हवतं. कारण माझ चंचल मन आजूनही तिकडे ‘कोकणकड्यावरती’ आणि ‘हरिश्चंद्रगडावरतीच’ रेंगाळत होतं आणि त्याच अविस्मरणिय आठवणींच्या डोहात कधी शांत आणि गाढ झोप लागली काही कळलंच नाही…..!!!

रविंद्र इनामदार.
(एक हौशी सह्यभटका)