K2S: याच साठी केला होता अट्टहास !

१३ टेकड्या पार करुन आणि १६ किलोमीटर अंतर रात्री पायी चालून हे दृश्य दिसनार असेल तर मग,
It’s worth it !

मनात खूप दिवसांपासून होतं कि कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक एकदातरी करायला पाहीजे. २४ मार्च २०१८ ला “स्वछंद गिर्यारोहक” ह्या ट्रेकिंग क्लब सोबत हा ट्रेक पूर्ण केला. खरंच प्रत्येक ट्रेकरने एकदातरी हा अनुभव घ्यावा असा हा ट्रेक !

आम्ही संध्याकाळी ७:३० ला स्वारगेट वरून PMT च्या बसने जुन्या कात्रज बोगद्या जवळ पोहचलो आणि वाघजाई मंदिरपाशी जाऊन थांबलो. अजून एक ग्रुप यायचा बाकी होता, ते आल्यावर सर्वांनी सोबत निघायचं अस ठरलं. तोपर्यंत आम्ही रात्रीच्या रोषणाईमध्ये मढलेल्या पुण्याकडे पाहत बसलो. दुसरा ग्रुप आल्यानंतर कळलं कि आम्ही एकूण ५४ जण आहॊत. ट्रेक lead विशाल काकडेच्या instruction ऐकून रात्री ९:४५ ला आमचा प्रवास चालू झाला.

रात्रीची ती निरव शांतता, वर आकाशात सुंदर चांदणं आणि एका बाजूंला रोषणाई मध्ये झोपलेलं पुण हे सर्व डोळ्यामध्ये साठवत एका मागून एक टेकड्या पार करायला लागलो. ७वी टेकडी पार करून आराम करत असताना कळलं कि शेवटच्या दोन टेकड्या खूप दमछाक करणाऱ्या आहेत, म्हणून मग परत एकदा जोमानी चालायला सुरवात केली. खरंच शेवटच्या दोन टेकड्या कस काढणाऱ्या होत्या. एकतर इथे पोहचता पोहचता आमच्या कडच पाणी संपलं होत आणि पायपण आता बोलायला लागले होते.

सकाळी ४:३० वाजता, १३वी टेकडी उतरून आम्ही last मीटिंग पॉईंटला पोहचलो. प्रत्येकाचं कपडे घामानी भिजले होते, पायाचे तुकडे पडले होते पण मनात मात्र आनंद होता काहीतरी मिळवल्याचा , काहीतरी पूर्ण केल्याचा !

आता मात्र सर्व जण जिथे जागा मिळेल तिथे झोपले होते कारण मागे अजून खूप जण राहिले होते. घरच्या गादी पेक्षा इथे वाळलेल्या गवताची जमीन आता मऊ लागत होती. पुढचा ३ किलोमीटरचा प्रवास जीपने करून आम्ही सकाळी ६:०० ला सिंहगडाच्या पार्किंग ला पोहचलो.

एव्हरेस्ट सर केल्यावर जो आनंद व्हावा त्याच्या ०.००१% च हा आनंद असेलही पण अनुभव मात्र खूप प्रेरणादायक होता.

स्वछंद गिर्यारोहक टीमचे विशष आभार कारण ५० लोकांनां घेऊन त्यांनी ही अवघड वाटणारी मोहीम लीलया पार पाडली.

Written By

Vishvas Trikutkar

Original Post

Instagram Post
7 Responses
 1. Savita Kanade

  मोजक्या शब्दात यथार्थ वर्णन….

  एका ट्रेकला मी आणि उषाने टेकड्या मोजल्या.त्या 15 तर नक्कीच आहेत…

  तुम्ही 13 नाही 15 टेकड्या पार केल्या आहेत…..

  अभिनंदन✌

  keep hiking
  keep writing

 2. महेंद्र घोरपडे

  हो…खरोखर हा ट्रेक अतिशय सुंदर आनुभव देऊन जातो…
  प्रतेक वेळी नविन कही तरी अनुभवल्याचा आनंद मिळतो…😊

 3. Usha

  Well written….
  as savita madam said you ascended and descended 15 hills….
  Keep writing and sharing your experiences…

Leave a Reply