महाराष्ट्र दिनादिवशी कळसुबाई शिखर

लहानपणा पासून पाठयपुस्तकात वाचलेलं, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर, आज ते अनुभवलं.
खरंतर हा योगायोगच खूप सुंदर होता. महाराष्ट्र दिनी, महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावर जाऊन, आपल्या सह्याद्री पर्वतरांगेला जवळून पाहण्याचा, तिला प्रणाम करण्याचा तो योग होता.

पुण्यावरून रात्री निघून सकाळी ३:१५ ला आम्ही अकोले तालुक्यातल्या बारी या गावात पोहचलो. खरतर आम्हाला उशीर झाला होता, म्हणून लवकरच आवरा-आवर करून आणि ग्रुप मधील मेम्बर्सची ओळख करून , पहाटे ०४:०० वाजता आम्ही चढाईला सुरवात केली. आमच्या सोबतीला चंद्राचा प्रकाश होता त्यामुळे सोबत आणलेल्या Torch ची गरज वाटत न्हवती. कळसुबाईची चढाई अवघड नसली तरी थकवणारी जरूर आहे. अर्धी चढाई झाल्यावर पायऱ्या दिसू लागतात. पायऱ्या चढून झाल्यावर आपण एका छोट्या पठारावर येतो परंतु शिखर अजून दुरच दिसत. इथून चालू होते थकवणारी चढाई.

शिखरावर पोहचण्यासाठी लोखंडाची एक शिडी आहे ८४ पायऱ्या असलेली. आम्हाला शिखर गाठायला जवळ जवळ ०४:०० तास लागले आणि आम्ही सकाळी ०८:०० वाजता शिखर गाठलं. खरतर सूर्योदय शिखरावरून पाहायची इच्छा होती परंतु आम्ही अर्ध्या रस्त्यात असतानाच सूर्यानी आपल्या छटा दाखवायला सुरवात केली.

Ladder
Kalsubai Trek Route

मला जर कोणी विचारलं कि मी का ट्रेकिंग करतो तर त्याच एक उत्तर म्हणजे हे निसर्गाचं कधीही पुनरावृत्तीत न होणार आगळवेगळं रूप पाहण्यासाठी. प्रत्येक सूर्योदय विलक्षण सुंदर असतो त्याच स्वतःच एक वेगळेपण असत जे कालही नव्हत आणि उद्याही नसेल. खरतर निसर्ग आपल्याला सांगत असतो Nothing is Permanent!

शिखरावर कळसूबाईच एक छोट मंदिर आहे. मंगळवार असल्यामुळे एक पुजारी होता आणि पूजा पण झाली होती. शिखरावरून समोरच अलंग मदन आणि कुलंग हे किल्ले दिसतात तसेच एका बाजूला एकटाच उंच उभा असलेला रतनगड पण दिसतो.

Kalsubai Temple
View from Kalsubai Peak

साधारण एक तास शिखरावर घालवून आणि तिथून दिसणाऱ्या सह्याद्रीचं ते भव्य रूप डोळ्यात साठवून आम्ही परतीच वाटेला लागलो. मे महिना असल्यामुळे, सूर्य आता ९:०० वाजताच तळपायला लागला होता, त्यामुळे उतरन, चढाई पेक्षा अवघड वाटत होती. आम्ही उतरत असताना, खालच्या गावातले लोक चढत होते त्यात अगदी ४-५ वर्षाच्या लहान मुला मुलीनं पासून ते साठीतल्या म्हाताऱ्या पर्यंत सगळे होते. त्यातले काहीजण तर अनवाणी होते. त्यांच्यासाठी ही काय ट्रेकिंग नव्हती ते तर कळसूबाईच्या दर्शनासाठी चालले होते.

शेवटी काय तर श्रद्धा ! आमची श्रद्धा होती त्या सह्याद्रीवर तर त्यांची होती कळसुबाई वर !

भर उन्हात दुपारी १२:०० वाजता आम्ही परत गावात पोहचलो आणि परत कळसुबाईला वंदन करून पुण्याचा प्रवास चालू केला !

Me
Trek Group
SG-Trekkers
Written By

विश्वास रत्नाकरराव त्रिकुटकर

What do you think about this post?
Share your thoughts. Please, leave A comment.

4 Responses
 1. Vinod Kathar

  मस्त , उत्तम , मुददेसुद मांडणी, स्वतः कळसुबाई सर केलयासारखे वाटते.
  Good job keep it up.

 2. Mahipal Rampally

  Nice write-up Vishwas, one more skill in your box. Wish you write more next time, your blog is interesting but finished quickly. Your observations are good but I am sure you can detail them out even better. Look at your Kalsubai temple photo, it speaks a lot and deserves more text. I wish you all the best in blogging world, keep writing.

 3. vishvas.trikutkar

  Thank you Vinod, Savita Madam and Mahipal.

  @Mahipal, Appreciate you input. I too feel the same. I will definitely try to be more descriptive now on.

Leave a Reply

Upcoming Activities

Velas Turtle Festival Eco Tour

Anjarle Turtle Festival Eco Tour

Recent Article

Facts about Velas Turtle Festival
February 28, 2019
Andharban Trek
January 1, 2019
एका भटक्याचं सुख
December 18, 2018

Get a Question?

Do not hesitage to give us a call. We are an expert team and we are happy to talk to you.

+91 8983898528

sgtrekkers@gmail.com